कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान
schedule17 Jan 26 person by visibility 47 categoryउद्योग
इचलकरंजी : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिः हुपरी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व हुपरी पोलीस ठाणे, हुपरी यांचे वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले.
यावेळी आरटीओ अजिंक्य डुबल यांनी, बैलगाडी, अंगद ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढऱ्या व मागील बाजूस कारखान्यामार्फत दिली जाणारी लाल रंगाची रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. एक साधा रिफ्लेक्टर अनेकांचे अनमोल जिव वाचवू शकतो. वाहनांमध्ये क्षमते एवढाच ऊस भरावा, ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, रिकामे वाहन बेदरकारपणे चालवू नये, तसेच ऊस वाहतूक वाहनात टेपरेकॉर्डर व स्टेरिओचा वापर करु नये. आपल्या वाहनांची आरटीओ कागदपत्रे, वाहनाचा विमा व वाहनचालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक आहे. अशा सूचना केल्या.
हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितिन चौखंडे यांनी, वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमीत देखभाल ठेवावी जेणेकरून आपल्या वाहनांतील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत. तसेच हुपरी गावातून रूई व पट्टणकोडोली मार्गे ऊस भरून येणारी वाहने आणि कारखान्यावरून रिकामी होवून जाणा-या ऊस वाहनांची वाहतूक ही बायपास मार्गानेच करणेची आहे. रात्रीच्या वेळी विविध कारखान्यांतील कामगार कामावर ये-जा करत असतात त्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालवावीत. या सर्व नियमांचे पालन करून रस्त्यावरील ऊस वाहतूक सुरळीत ठेवून आपले व सामान्य नागरिकांचे अनमोल जिवन सुरक्षित ठेवण्याचे महत्वाचे काम करावे. यामुळे आपले व सामान्य नागरिकांचे कुटुंबिय सुखा-समाधानात राहतील असे सांगीतले.
स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे यांनी केले. यावेळी हुपरी पीएसआय माया वायकर, ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, जनरल मॅनेजर टेक्नीकल विकास कवडे, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, सिनियर ओव्हरसियर जयपाल गिरीबुवा, भूषण कोले, मॅनेजर एचआर अनिल वलशेट्टी, व्हेईकल इनचार्ज सुदेश मॅच, सुरक्षा अधिकारी संजय वासमकर, सेफ्टी ऑफीसर कैवल्य शास्त्री आणि ऊस वाहतूक वाहन मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले आणि सर्व उपस्थितांचे आभार केलयाई सुपरवाझर सुदर्शन जंगले यांनी मानले.