SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा मिल राेलर पूजन

schedule09 Jul 26 person by visibility 417 categoryउद्योग

इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 या 34 व्या गाळप हंगामासाठी मिल राेलर पूजनाचा धार्मिक विधी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार  कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते  झाला.

यावेळी ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी, चालू गळीत हंगामात 20 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सभासद तसेच बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून कारखान्याच्या प्रगतीत माेलाचे याेगदान द्यावे, असे आवाहन केले. कारखाना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वाेच्च प्राधान्य देत असून, ऊस ताेड, वाहतूक, गाळपासाठी शिस्तबद्ध कार्यपद्धती राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी, सभासद, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाे चाैगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, केन कमिटीचे चेअरमन दादासाे सांगावे, कारखान्याचे संचालक सर्वश्री संजयकुमार काेथळी, अभयकुमार काश्मिरे, सूरज बेडगे, गाैतम इंगळे, प्रकाश पाटील, शितल आमण्णावर, महेश पाटील, पार्श्वनाथ उफर् सुनिल नारे, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव, साै. वंदना कुंभाेजे, साै. कमल पाटील आणि कार्यकारी संचालक  मनाेहर जाेशी तसेच सांगावचे सभासद शेतकरी महावीर मगदूम व निमशिरगांवचे पापा पाटील व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित हाेते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes