SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील व्यवसाय परवाना न घेतल्याने महापालिका व अग्निशमन विभागाची संयुक्त कारवाईगोकुळ निवडणुकीत महायुतीच 'मोठा भाऊ' राष्ट्रवादी; हसन मुश्रीफांचा दावा; दूध संघासह अन्य राजकीय घडामोडींवर विमानतळावर स्पष्टच बोललेसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात भूदान चळवळीचे प्रणेते: भारतरत्न आचार्य विनोबा भावेकोल्हापूर : गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाईफिटनेससोबत आरोग्य आणि मनोरंजनाचा संगम; रग्डियन ठरतंय कोल्हापुरकरांचं फिटनेस डेस्टिनेशन!माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकरकोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यातकोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जाहिरात

 

विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील व्यवसाय परवाना न घेतल्याने महापालिका व अग्निशमन विभागाची संयुक्त कारवाई

schedule11 Sep 26 person by visibility 156 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता तसेच परवाना विभागाकडे अर्जही दाखल न करता सुरू ठेवण्यात आलेल्या ताराबाई रोडवरील आरिफ मनेर यांच्या लॉजिंगवर महानगरपालिकेच्या परवाना व अग्निशमन विभागाने आज धडक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित लॉजिंग सील करण्यात आली. हि कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

ताराबाई रोड येथील तीन मजली इमारतीमध्ये लॉजिंग विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी संबंधित परवाना विभाग तसेच अग्निशमन विभागाकडून नियमानुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी व्यवसाय परवाना घेतला नाही. तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेला अर्जही दाखल केला नव्हता.

  त्यामुळे नियमानुसार आज महापालिकेच्या परवाना व अग्निशमन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत लॉजिंग सील केली.

 ही कारवाई परवाना अधीक्षक अशोक यादव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी जयवंत खोत, विजय सुतार, परवाना निरीक्षक संदीप भोई, शिवाजी कोकरे, भोलानाथ पाटणकर, अग्निशमन व परवाना विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

◼️परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन

  कोल्हापूर शहर हद्दीतील सर्व व्यावसायिक व आस्थापनाधारकांनी महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना प्राप्त केल्यानंतरच व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes