SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफीसण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या कोल्हापुरात प्रशासनाची धडक मोहीम: राजारामपुरी व लक्ष्मीपुरी परिसरातील रस्ते अडविणारी ४३ चार चाकी बेवारस वाहने हटविली! मनुष्यजीवनाला मोल आहे! 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त' आत्मपरीक्षण आणि जनजागृतीची नितांत गरजकोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला करवीरमध्ये तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रामंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदेएसआयआर अंतर्गत मतदार यादीत पात्र मतदारांच्या समावेशासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले

जाहिरात

 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सील

schedule10 Sep 26 person by visibility 104 categoryमहानगरपालिका

▪️महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून 22 लाखांची वसुली

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभाग व उपद्रव शोध पथकाने छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये धडक कारवाई करत महापालिकेचे भाडे थकीत असलेले तब्बल 13 गाळे सील केले. या कारवाईदरम्यान काही गाळेधारकांनी जागेवरच थकीत रकमेचा भरणा केल्याने महापालिकेच्या तिजोरीत 22 लाख 22 हजार 368/- रुपयांची वसुली झाली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार आज ही कारवाई करण्यात आली.

  महापालिकेच्या शहरातील विविध गाळ्यांच्या भाड्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. सन 2019 ते 2026 या कालावधीतील थकबाकी भरण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी गाळेधारकांना सवलत योजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही काही गाळेधारकांकडून थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या मार्केटमधील एकूण थकबाकी सुमारे 1 कोटी रुपये आहे. कारवाई पूर्वी संबंधित गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत कार्यालयामार्फत नोटिसा व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, थकबाकी न भरल्याने अखेर 13 गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली. या कारवाईत किराणा, इलेक्ट्रीक, लॉटरी व चप्पल लाईनच्या गाळ्यांचा समावेश आहे. 

दरम्यान, उर्वरित काही गाळेधारकांनीही आज तातडीने थकीत रकमेपैकी काही रक्कम महापालिकेकडे जमा केली. उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे तसेच इस्टेट विभागातील कर्मचाऱ्यांनी व उपद्रव शोध पथकातील जवानांनी ही कारवाई केली.

    महापालिकेच्या गाळ्यांमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या सर्व गाळेधारकांनी आपली थकबाकी तात्काळ भरावी अन्यथा थकबाकीदार गाळ्यांवरही सील बंदची कारवाई करण्यात येईल असा इशारा इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes