SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, इंडियन मेडिकल असोशिएशन कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसादकोल्हापूर : शरीरास घातक असणारे मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशिररित्या विकणाऱ्या एकास अटकक्षयरुग्णांसाठी कलेतून समाजसेवेचा अनोखा उपक्रम : जिल्हाधिकारी अमोल येडगेरायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशाराकोरे अभियांत्रिकीतील ई अँड टी सी विभागाचे सलग सहाव्या वर्षी १०० टक्के प्लेसमेंटदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची सीमावासियांना मोठी अपेक्षा..." शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारातंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसाद

जाहिरात

 

कोल्हापूर : शरीरास घातक असणारे मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशिररित्या विकणाऱ्या एकास अटक

schedule22 Jun 25 person by visibility 140 categoryगुन्हे

कोल्हापूर  : मेफेनटेरमाईन सल्फेट [MEPHENTERMINE SULPHATE] हे शरीरास घातक असणारे इंजेक्शन बेकायदेशिररित्या विक्री करणाऱ्या इसमास अटक करण्यात आली त्याच्याकडून ६३,०००/- रुपये किंमतीची इंजेक्शन व मोबाईल असा ७३,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

मेफेनटेरमाईन सल्फेट | MEPHENTERMINE SULPHATE) हे इंजेक्शन डॉक्टरांचे सल्याशिवाय घेतल्यास मानवी जिवीतास धोका होवून मानवी जिवनावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असतानाही जीम करणारी तरूण मुले कमी कष्टामध्ये लवकर मसल्स तयार होवून आपले शरीर आकर्षक दिसावे याकरीता मेफेनटेरमाईन सल्फेट हे घातक इंजेक्शन आपल्या शरीरामध्ये टोचून घेत असल्यामुळे शरीरावर दुष्परीणाम होवून भविष्यात शरीरातील एखादा अवयव निकामी होण्याची शक्यता असते. असे असतानाही काही लोक अशा प्रकारच्या औषधांची चोरुन विक्री करीत असलेने अशा प्रकारच्या लोकांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

पथक त्याअनुषंगाने शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना गोपनीय बातमी मिळाली की, प्रयाग चिखली ता. करवीर येथील अमोल पाटील हा इसम जिमच्या तरूण मुलांना मेफेनटेरमाईन सल्फेट हे घातक इंजेक्शन विक्री करत असतो व तो दिनांक २१/०६/२०२५ रोजी रजपुतवाडी, ता. करवीर येथील क्रांती लॉजींगचे समोर विक्रीसाठी येणार आहे. अशी माहिती मिळाली असता पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे अमोल अशोक पाटील, वय ३४ वर्षे, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर यास पकडून त्याचे कब्जातून बेकायदेशिररित्या विक्री करणेकरिता आणलेले ६३,०००/- रूपये किंमतीच्या मेफेनटेरमाईन सल्फेट [MEPHENTERMINE SULPHATE] इंजेक्शनच्या एकूण ६३ बॉटल व एक मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ७३,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशिर प्रक्रीया करून पंचांचे समक्ष जप्त केला आहे. 

आरोपी विरुध्द करवीर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीने सदरची इंजेक्शन कोठून आणली याबाबतचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणेकडून सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक  योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. धीरज कुमार , यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अमंलदार सत्यजीत तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, संतोष बरगे, गजानन गुरव, प्रदिप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, राजु कांबळे, योगेश गोसावी यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes