SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीतील ई अँड टी सी विभागाचे सलग सहाव्या वर्षी १०० टक्के प्लेसमेंटदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची सीमावासियांना मोठी अपेक्षा..." शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारातंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक बैठकीचे पालकमंत्र्याकडून ठोस आश्वासनमेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार : पंकजा मुंडे

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीतील ई अँड टी सी विभागाचे सलग सहाव्या वर्षी १०० टक्के प्लेसमेंट

schedule22 Jun 25 person by visibility 176 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ असे सलग सहा वर्षे विविध बहुराष्ट्रीय कंपनीमधे १०० टक्के प्लेसमेंट झाले.


२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये पल्लवी गायकवाड हिला पायनोमियल टेक्नॉलॉजी पुणे या कंपनीचे सर्वाधिक सात लाख अकरा हजरांचे पॅकेज मिळाले. विभागातील विद्यार्थ्यांना सरासरी तीन लाखांचे पॅकेज मिळाले.

विद्यार्थ्यांचे पायनॉमिअल टेक्नॉलॉजी पुणे, मित्सुबिशी इलेक्ट्रिक, टिचनुक बेंगलोर, इन्फोसिस, गेम क्लाऊड टेक्नॉलॉजी, सिंध टेक्नॉलॉजी, क्यूस्पाईडर पुणे, फाईन आर्क सिस्टम प्रा. लि. पुणे,किरण अकॅडमी पुणे, पी.एच.एन टेक्नोलॉजी, क्रेस्ट टेस्ट सिस्टम, प्रा. लि. पुणे, आयटीप्रेन्युअर या व इतर बहुराष्ट्रीय कंपन्यात निवड झाली.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा मौलिक सल्ला दिला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विलास कारजिन्नी, अधिष्ठाता,डॉ एस. एम. पिसे ,प्राचार्य डॉ. डी. एन माने,  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. जे  पाटील व सहयोगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. सी. शिक्केरी, ई अँड टी सी विभाग प्रमुख डॉ. एस. टी. जाधव , विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. एस. एच. मोरे, विभागातील सर्व प्राध्यापक व  कर्मचारी या सगळ्यांचे सहकार्य लाभले व प्लेसमेंट साठी योग्य नियोजन केले, यासाठी विद्यार्थी प्रतिनीधी वैष्णवी अडनाईक हीचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes