SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीतील ई अँड टी सी विभागाचे सलग सहाव्या वर्षी १०० टक्के प्लेसमेंटदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची सीमावासियांना मोठी अपेक्षा..." शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारातंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक बैठकीचे पालकमंत्र्याकडून ठोस आश्वासनमेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार : पंकजा मुंडे

जाहिरात

 

तंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसाद

schedule21 Jun 25 person by visibility 251 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ करिता अभियांत्रिकी पदवी ( प्रथम व द्वितीय वर्ष ) व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात शनिवार, दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रवेश  प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. तंत्रज्ञान अधिविभाग सभागृहात पार पडलेल्या या सेमिनारला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत प्रवेश पद्धतीने केली जाते, त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थी व पालक यांना सविस्तर समजवून देणे हा या सेमिनारचा मुख्य हेतू होता.

 या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी म्हणजे काय, अभ्यासक्रमाचे स्वरूप, विविध शाखा, शाखांची निवड कशी करावी, राज्यातील सरकारी व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता राबवण्यात येणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) मधील अर्ज करण्याची पद्धत, महाविद्यालय पसंती क्रमांक, जागावाटप या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्या अनुषंगाने होणारे बदल, भविष्यात असणाऱ्या रोजगार संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध स्कॉलरशिप, विद्यापीठाच्या विविध योजना, सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी फी सवलत व मोफत वसतिगृह योजना याविषयी मार्गदर्शन, तसेच लागणारी कागदपत्रे व प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप याविषयीची समग्र माहिती देऊन उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन विभागाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी डॉ. गणेश पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांना  सक्षम अभियंता बनण्यासाठी तांत्रिक ज्ञान व कौशल्य विकासाची गरज असते, त्यामुळे विदयार्थ्यांनी योग्य अभ्यासक्रम व शिक्षणसंस्था करिअरसाठी निवडाव्यात असे प्रतिपादन तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रसंचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी यावेळी केले. तसेच तंत्रज्ञान अधिविभागामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रामधील विविध शाखांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये पदवीसाठी कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीरिंग, सिव्हिल इंजिनीरिंग आणि मेकॅनिकल इंजिनीरिंग या शाखांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर  सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग,  फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, एनव्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश असून अभियांत्रिकीमधील विविध शाखांचे पी.एच.डी. अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 

अधिविभागाच्या या सेमिनारला मोठ्या संखेने विद्यार्थी व पालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती प्राप्त करून घेतली. सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश प्रक्रियेची माहिती नव्हे तर शिवाजी विद्यापीठातील प्लेसमेंट सेलचे यश, परदेशी गेलेले विद्यार्थी, स्पोर्ट्स मध्ये मिळवलेले यश , आधुनिक लॅब्स, होस्टेल्स व अकॅडमिक वातावरण याचीही माहिती देण्यात अली. 

सदर सेमिनारमध्ये विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी शिक्षणाची संपूर्ण माहिती दिली. सेमिनारचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षवर्धन पंडित यांनी केले.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी  (०२३१ ) २६०९४२४ / २६०९४१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रसंचालक प्रा. डॉ. अजित कोळेकर यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes