घोडावतला रायझिंग स्टार ऑफ इंडिया पुरस्कार
schedule18 Apr 25 person by visibility 272 categoryशैक्षणिक

अतिग्रे : गोवा इथे पार पडलेल्या प्राइड ऑफ इंडिया अवॉर्ड्स आणि लीडरशिप समिट 2024 -25 मध्ये संजय घोडावत ग्रुपच्या, घोडावत कंजूमर लिमिटेड ला 'रायझिंग स्टार ऑफ इंडिया' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्टार रिफाइंड ऑइल या उत्पादनाने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा तसेच बेळगाव, हुबळी, धारवाड या ठिकाणी ग्राहकांच्या मध्ये विश्वास आणि निष्ठा प्राप्त केल्याबद्दल व उत्पादनामध्ये गुणवत्ता आणि ग्राहकांच्या फायद्याविषयी खात्री निर्माण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारा बद्दल आपल्या भावना व्यक्त करताना घोडावत कंजूमर लिमिटेडच्या कार्यकारी अधिकारी सलोनी घोडावत म्हणाल्या, की प्रत्येक मोठ्या ब्रँडचा पाया हा विश्वासावर अवलंबून असतो. उत्पादनामध्ये ग्राहकांना गुणवत्ता देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, याचेच प्रतिबिंब म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. यासाठी नेहमीच कष्ट घेणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत, श्रेणिक घोडावत यांनी घोडावत कंजूमर लिमिटेड साठी कष्ट घेणाऱ्या कार्यकारी अधिकारी सलोनी घोडावत व सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.