SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांकदेशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणसारथी अंतर्गत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधीआत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली; योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षकअलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिकाशिवाजी विद्यापीठातील प्रियंका पवारची जर्मनीतील हॅनोवर विद्यापीठामध्ये समर स्कूल प्रोग्रामसाठी निवडप्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवादसिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदानडीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड

जाहिरात

 

जिल्ह्यातील मतदारांनी मतदार कार्डसोबत आधार क्रमांकाची जोडणी करून घ्यावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

schedule13 Jul 22 person by visibility 147 categoryसामाजिक

🔸मतदार कार्डशी आधार जोडणी १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार, यासाठी मतदारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

🔸नमुना फॉर्म क्र. 6 ब www.eci.gov.in व https://ococlection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध
 
कोल्हापूर : कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्डसोबत आता आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पासून मोठया संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

मतदार नमुना फॉर्म क्र. 6 ब व्दारे आधार क्रमांक सादर करू शकतात. आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे. नमुना फॉर्म क्र. 6 ब BLO यांच्या मार्फतही घरोघरी भेटी देवून गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराच्या आयोजनामधूनही नमुना फॉर्म क्र. 6 ब गोळा करण्यात येईल. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचा-यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र यापैकी एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे.

आधार नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे - प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. 17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक नमुना फॉर्म क्र. 6 ब मध्ये भरून देवू शकतो. आवश्यक नमुना फॉर्म क्र.6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल.

नमुना फॉर्म क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या www.eci.gov.in व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ococlection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना फॉर्म क्र.6 ब ERO NET GARUDA NVSP, VHP या माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes