कोल्हापुरात पतीने केला पत्नीचा खून, स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली
schedule06 Aug 25 person by visibility 983 categoryगुन्हे

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पती परशुराम पांडुरंग पाटील याने पत्नी अस्मिता हीचा गळा चिरून खून केला. कळंबा येथील सुर्वे नगरातील महालक्ष्मी कॉलनी येथे मंगळवारी (दि.५) मध्यरात्री ही घटना घडली. घटनेनंतर स्वतः करवीर पोलिस ठाण्यात फोन करून त्याने खुनाची कबुली दिली. खुनाचे कारण समोर आले नसले तरी हात उसने घेतलेल्या व्याजाचे पैसे काय केले यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते.
याबाबत माहिती अशी की,मूळचे सावर्डे पाटण तालुका राधानगरी येथील पांडुरंग पाटील उद्यम नगरात फोंड्री व्यवसायात आहेत. ते महालक्ष्मी कॉलनी येथे गेली बारा वर्षे भाड्याच्या घरात दोन मुले, वडील यांच्यासोबत राहत होते. दरम्यान काल रात्री पत्नीने हात उसने घेतलेल्या व्याजाच्या पैशाचे नेमके काय झाले यावरुन दोघांत वाद झाला. रात्री जेवण करून दोघे झोपण्यासाठी गेले असता पुन्हा वाद झाला. पती पांडुरंगला राग अनावर झाल्याने त्याने पत्नीचा गळा चिरून खून केला. अन् स्वतः करवीर पोलिस ठाण्यात फोन करून खुनाची कबुली दिली
तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत.