आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील
schedule06 Aug 25 person by visibility 324 categoryराजकीय

कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पूर्वतयारी करत आहे. सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचे सक्षम आणि ताकदिचे कार्यकर्ते आहेत. पण राज्यात आणि केंद्रात महायुती म्हणून आपण काम करतो या महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवल्या जातील व जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपचे केले जातील असा विश्वास याप्रसंगी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात आज भाजपच्या संघटनात्मक तीन जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या बैठका माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय नगरपालिका निहाय आढावा घेण्याचे काम यावेळी चंद्रकांतदादांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील येणाऱ्या एकूण 68 जिल्हा परिषद गट व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मधील राजकीय स्थिती काय आहे याचा अंदाज दादांनी घेतला .
भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवून या राज्यासाठी देण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या योजना गोरगरिबांच्या कल्याणार्थ सरकार करत असलेले काम याचा सांगोपांग विचार करून हे सगळे काम जनतेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेऊन जावे व आगामी निवडणुकांसाठी समाजाच्या संपर्कात राहावे अशा सूचना चंद्रकांत दादांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिल्या .
मजबुत संघटनात्मक बांधणीच्या आधारेच भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेपर्यंत पोहोचत असते अशा विकासाच्या अनेक माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क करावा असे आवाहन यावेळी दादांनी केले .
यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे , माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष उपस्थित होते.