नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरचे यश
schedule10 Jun 25 person by visibility 429 categoryक्रीडा

कोल्हापूर : नवी दिल्ली येथे 7 ते 10 जून दरम्यान दिल्ली बुद्धिबळ असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर २००० फिडे रेटिंग खालील बी कॅटेगरी बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर १० फेरीत ८ गुण मिळवून संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आणि क्रमवारीत १० नंबर मिळवला त्याला ६०००० रुपये आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर तेलंगणा राज्यातील सार्थक अदबतला या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याला चार लाख रुपये बक्षीस घेऊन त्याला गौरवण्यात आले.
या स्पर्धेला तब्बल ८५८ खेळाडूंनी भाग घेतलेला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकित ७३९ खेळाडू होते. ऋषिकेश ची बहीण शर्वरी कबनूरकर हिने पाच गुण मिळवले. या बी कॅटेगरीच्या स्पर्धेला एकूण 35 लाख रुपये बक्षीस होते .
या स्पर्धेत तीन कॅटेगरीमध्ये स्पर्धा खेळण्यात आली. एक ग्रँड मास्टर एक कॅटेगरी 2000 रेटिंग च्या खालील, बी कॅटेगरी आणि 1700 रेटिंग च्या खाली अशा तीन कॅटेगिरी मध्ये ही स्पर्धा खेळण्यात आली. या स्पर्धेला एकूण बक्षीस एक कोटी २१ लाख रुपये रकमेची होती.
ऋषिकेश हा विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी त्यास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, बुद्धिबळ प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.