SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम मार्गावरील 'त्या' खुनाचा अवघ्या ६ तासात उलघडा

schedule01 Dec 25 person by visibility 631 categoryगुन्हे

कोल्हापूर  : जुनाराजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील हॉकी स्टेडीयम जाणारे रोडवर विश्वपंढरी समोर फुटपाथवर झालेल्या त्या खुनाचा गुन्हा अवघ्या ६ तासात उलघडा झाला. सिध्दु शंकर बनवी, वय २० वर्षे, रा. वाशी नाका, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण  कोल्हापूर शाखेने केली.

दिनांक ०१ डिसेंबर रोजी पहाटे गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडीयम जाणारे रोडवर विश्वपंढरी समोर फुटपाथवर इलेक्ट्रीक पोलला केबलव्दारे गळा आवळून संशयास्पदरित्या खुन झाला असलेची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी श्रीमती प्रिया पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण व त्यांचे पथक तसेच जुनाराजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक  किरण लोंढे व त्यांचा स्टाफ यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची माहिती घेतली.

तपास पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनेच्या ठिकाणी जाणारे येणारे मार्गावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहुन तांत्रीक पुराव्याचे अधारे माहिती घेत असताना पो.स.ई. जालिंदर जाधव यांचे पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना सदरचा खुन हा मनिष राऊत, रा. कळंबा रिंग रोड, राऊत कॉलनी, कोल्हापूर यांनी केला असल्याचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली असता सदर पथकाने त्यास कळंबा रिंग रोड परिसरातून तात्काळ शोध घेवून त्यास पकडले. त्याचे पुर्ण नाव व पत्ता मनिष जालींदर राऊत, वय २८ वर्षे, रा.१०२२ कळंबा रिंग रोड, राऊत कॉलनी, कोल्हापूर असे असल्याचे सांगीतले. 

त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याच्या ओळखीचा सिध्दु शंकर बनवी, वय २० वर्षे, रा. वाशी नाका, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर याचे सोबत आरोपी जेवन करण्यासाठी गेलेला असताना त्या दोघांमध्ये दारूच्या नशेत वाद झाला. त्यावेळी मयत याने आरोपीस आईवरून शिवी दिल्यामुळे आरोपीने रागाच्या भरात

रस्त्याचे कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला लटकत असलेल्या केबलने सिध्दु बनवी याचा गळा आवळून खुन केल्याची कबुली दिली.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक, योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक श्री. धीरजकुमार, व मा. पोलीस उप अधिक्षक, श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण, जुनाराजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक  किरण लोंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे स.पो.नि. सागर वाघ, पो.स.ई. जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसवी, समीर कांबळे, रोहीत मर्दाने, संतोष बरगे, परशुराम गुजरे, संजय हुंबे, हिंदुराव केसरे, महेश खोत, सतिश जंगम, संदिप बेंद्रे, महेश पाटील, सागर माने, विनायक चौगुले, प्रदिप पाटील, युवराज पाटील, अमित सर्जे, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes