SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शनबाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्नधर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामापंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजापेपरफुटी विरोधात कोल्हापुरात आज शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च

जाहिरात

 

‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

schedule25 Jul 26 person by visibility 139 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : डी. वाय.  पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेच्यावतीने अभियांत्रिकीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत  मंगळवार , दि. २८ जुलै रोजी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या सेमिनारमध्ये ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत. 

प्रवेश प्रक्रिया फेऱ्यांमध्ये झालेला बदल , ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वीची तयारी ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका, कट-ऑफचे विश्लेषण, गुणवत्तेनुसार योग्य शाखा व महाविद्यालयाची निवड, अलॉटमेन्टचे टप्पे व नियम, नवी शुल्क पद्धती,  तसेच प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती या सेमिनारात दिली जाणार आहे.

ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरणे ही अभियांत्रिकी प्रवेशाची अत्यंत महत्वाची पायरी आहे. हा फॉर्म भरताना कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या शंकांचेही निरसन केले जाणार आहे

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अभियंता बनण्याचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शनपर सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच ॲडमिशन हेड प्रा. आर. जी. बेन्नी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes