कोरे डिप्लोमा कॉलेजचा इंडक्शन कार्यक्रम जल्लोषात संपन्न
schedule07 Aug 25 person by visibility 450 categoryशैक्षणिक

वारणानगर : TKIET डिप्लोमा कॉलेज, वारणानगर येथे 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजित स्टुडंट इंडक्शन व ओऱिएंटेशन प्रोग्राम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उदघाटन दिवशी श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळाचे CEO डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी वारणा युनिवर्सिटी म्हणजे काय ? नवागत विद्यार्थ्यांना नवीन संधी, नाविन्यपूर्ण विचार आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कॅम्पस टूरमध्ये वसतिगृह, ग्रंथालय, वारणा बँक, शिवनेरी ग्राउंड आदी महत्त्वाच्या सुविधांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.विभाग प्रमुख आणि विविध सेल्सचे समन्वयक यांनी शैक्षणिक धोरणे, परीक्षा प्रणाली, ग्रिव्हन्स सेल, महिला तक्रार निवारण सेल याबाबत माहिती दिली.विशेष सत्रात, "मानव मूल्य व व्यावसायिक नैतिकता" या विषयावर कृष्णात स्वाती (राज्य सरचिटणीस – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
प्राचार्य प्रा. पी. आर. पाटील यांनी "Engineer म्हणजे कोण?" या संकल्पनेचा अत्यंत सोप्या व प्रेरणादायी शब्दांत परिचय करून देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.डॉ. पी. एम. पाटील यांनी येणाऱ्या काळातील आव्हाने, स्पर्धा व आवश्यक कौशल्यांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए. पी. देशमुख व प्रा. टी. ए. पाटील यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन प्रा. ए. व्ही.पाटील यांनी केले, तसेच प्रा. ए.एन. गुरव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.नवीन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ज्ञान, मूल्य आणि प्रेरणेचा सुंदर अनुभव ठरला.