SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजनज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी डॉ. रासकर यांची निवडकोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिकेकोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठावडिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश; अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्रसंथ चाल, सुरक्षित भविष्य: जागतिक कासव दिन!सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफशाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशाराशासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडफलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर

जाहिरात

 

ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी डॉ. रासकर यांची निवड

schedule23 May 26 person by visibility 139 categoryसामाजिक

कोल्हापूर : जेष्ठ नागरिक संघाची निवड पहिली वार्षिक सभा आस्था मल्टीपरपज हॉल, पुईखडी पेट्रोल पंप, नुकतीच उत्साहात पार पडली. 
राधानगरी रोड येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सुरु झाला आहे. या संघात अल्प काळात सभासद संख्या 54 पर्यंत गेली आहे. विनायक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा संघ सुरु झाला असून, कोल्हापूर शहर, आपटेनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व विविध सामाजिक तसेच मनोरंजन या सारखे उपक्रम या संघाद्वारे राबविले जाणार आहेत.

संघाची पहिली वार्षिक सभा होऊन त्यात कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यावेळी सभेला 50 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघ सुरु केल्यानंतर सरकारी योजनांची  माहिती मिळू शकेल. विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. 

तसेच सहली, कराओके संगीत, गाणी, एकांकिका, पिकनिक इ. आपण या माध्यमातून आयोजित करू शकू. यासाठी संघाची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी ज्येष्ठ नागरिक संघांचे सभासद व्हावे व याची आवश्यकता समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी या संघांचे सभासद व्हावे असे आवाहन अध्यक्ष विनायक कुलकर्णी यानी केले आहे. या सभेत कार्यकारिणी निवड करण्यात आली असून खालील प्रमाणे कार्यकारिणी सदस्य जाहीर करण्यात आले.      अध्यक्ष : विनायक कुलकर्णी उपाध्यक्ष - डॉ  देवेंद्र रासकर    सचिव - शरद दिवाण  कोषध्यक्ष - वृषाली गोटखिंडीकर   संचालक मंडळ:- डॉ सौ सुरेखा पाटील.  राजश्री सूर्यवंशी,  सिंधुताई शिरोळे,  दिलीप सासने,  महादेव कुंभार,  अशोक चौगुले,  दीपक पंडित.

या सभेत नवीन सदस्यांनी ओळख करून दिली त्यानंतर वाढदिवस साजरे करण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक गाणी सादर झाली.  सिंधुताई शिरोळे यांनी भारूड सादर केले. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes