कोल्हापूर पंचगंगा नदी घाट येथे पाय घसरून पाण्यात पडलेल्या वृद्ध महिलेला जीवदान
schedule17 Dec 25 person by visibility 87 categoryसामाजिक
कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावर आज सायंकाळी ६. ३०च्या दरम्यान साधारणता ७० वर्षाची सोमवार पेठ येथे राहणारी वृद्ध महिला पाय घसरून पाण्यात पडली यावेळी मासेमारी करणाऱ्यांनी आवाज दिल्याने तेथे उपस्थित असणाऱ्या पंचगंगा आरती मंडळाच्या सदस्यांनी त्वरित धाव घेतली व रमेश गवळी यांनी पाण्यात उडी मारून वृद्धमहिले ला काठावर आणले.
१०८ऍम्ब्युलन्स ला फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही यावेळी किशोर घाटगे यांनी ११२ नंबरला फोन केला असता अगदी ३ मिनटात पोलीस व ऍम्ब्युलन्स त्वरित येऊन वृद्धेला घेऊन गेले .
रमेश गवळी यांनी ४८जणांना आतापर्यंत जीवदान दिले असून पंचगंगा आरती व विहार मंडळाने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत.





