SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या कार्यकाळानिमित्त कोल्हापुरात ‘सेवा ज्योती यात्रा’राष्ट्रीय नूडल दिन: चवदार नूडल्सचा खास सोहळा!शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग"लाभले आम्हांस भाग्य..." समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तरकोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!

जाहिरात

 

चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

schedule06 Oct 26 person by visibility 135 categoryगुन्हे

कोल्हापूर : नेसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांना चरण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या आरोपीकडून दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

​ २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत आरोपीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने बळचोरीने लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
​तपास व कारवाई: पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत संशयित आरोपी बाळू कर्लेकर (रा. संतीबस्तवाड, ता. जि. बेळगाव) यास सापळा रचून ताब्यात घेतले.

​ कसून चौकशी केली असता त्याने नेसरी परिसरातील दरोड्याची कबुली दिलीच, शिवाय पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
​सध्या आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes