SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या कार्यकाळानिमित्त कोल्हापुरात ‘सेवा ज्योती यात्रा’राष्ट्रीय नूडल दिन: चवदार नूडल्सचा खास सोहळा!शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग"लाभले आम्हांस भाग्य..." समविचारी आघाडीची भाषा २५/० नाही तर दुधाला २५ रुपये दर वाढवून देणारी : आमदार सतेज पाटील यांचा राधानगरीच्या मेळाव्यात विरोधकांना प्रत्युत्तरकोल्हापुरात यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने पण उत्साहात; जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी!

जाहिरात

 

कोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंद

schedule06 Oct 26 person by visibility 171 categoryगुन्हे

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या 'नशामुक्त कोल्हापूर' मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शाहूपुरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. जयंती नाला परिसरात एम.डी. (Mephedrone) ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी रंगेहात पकडले.

​पोलिसांनी संशयित सॅम्युअल दिपक पवार (वय २२) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय २४, दोन्ही रा. शाहूपुरी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २० ग्रॅम एम.डी. ड्रग्स, मोबाईल आणि एक अ‍ॅक्टिव्हा गाडी असा एकूण २,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes