आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी साधला शिक्षकांशी संवाद...
schedule14 Feb 25 person by visibility 329 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : वारणानगर (ता.पन्हाळा) येथे शाहूवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वप्रथम 'कॉपी विथ आमदार' हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामध्ये आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.
शाहूवाडी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी तालुक्यातील उपक्रमशील व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक, केंद्रप्रमुख व शिक्षक संघटना प्रतिनिधी अशा ६० शिक्षकांशी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी वारणानगर येथे 'कॉफी विथ आमदार' या अभिनव उपक्रमाद्वारे संवाद साधला.
दुर्गम व डोंगराळ असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यात विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. ती जोपासण्यासाठी जबाबदारीने व कर्तव्यापलीकडे जाऊन शिक्षकांनी काम करावे तसेच शाहूवाडी तालुक्यातील ज्या गावामध्ये शिक्षक कमी आहेत तेथे मानधन तत्त्वावर शिक्षक देऊ, विद्यार्थ्यांची निवासी शिबिरे व क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांसाठी निधी देऊ व शाहूवाडीतील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढावी यासाठी वारणा शिक्षण समुहाद्वारे सर्व ती मदत करू असे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.
याप्रसंगी शिक्षकांनी शाळांत कमी असणारे शिक्षक भरणे, भौतिक सुविधा,धोकादायक इमारती, स्पर्धा परीक्षांसाठी सराव चाचण्या व शिबिरांचे आयोजन करणे, त्यासाठी निधी उपलब्ध करणे, विद्यार्थी उपस्थिती भत्ता वाढविणे, क्रीडा संकुल उभारणे, शिक्षकांची अशैक्षणिक व बीएलओच्या कामातून मुक्तता करणे आदी प्रश्नांच्या संदर्भात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी गटशिक्षण अधिकारी डॉ. विश्वास सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव सुतार, दिलीप पाटील, केंद्र प्रमुख प्रकाश काळे, सदाशिव थोरात, शिवराम मावची, कृष्णात कडू, शिक्षक संघटनेचे साहेब शेख, शिवाजी रोडे, सदा कांबळे, बाबूराव पाटील, उमेश कुंभार, अनिल कांबळे, विनायक हिरवे, शिवाजी काटकर, दिपक लाड आदी शिक्षक उपस्थित होते.