खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा पदाधिकार्यांनी केले राजर्षि शाहूंच्या स्मृतींना अभिवादन
schedule26 Jun 25 person by visibility 155 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आज आरोग्य शिबिर, होलोग्राफीक शो यासह विविध उपक्रम पार पडले. खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा पदाधिकार्यांनी आज दुपारी लक्ष्मी पॅलेसमध्ये जावून राजर्षि शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन केले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची आज १५१ वी जयंती ! या निमित्ताने कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये, विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. पुरातत्व विभाग आणि वस्तू संग्रहालय संचालनालय तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिवाय डोळे, कान, हृदयविकार, कॅन्सर, जनरल तपासणी करून, मोफत औषधांचे वाटप झाले. शिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरस्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपा पदाधिकार्यांसह भेट दिली. रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून खासदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केले. दरम्यान सृजन आनंद विद्यालयाच्या ३६ मुलांना, आज राजर्षि शाहू महाराजांच्या जन्मस्थळाची सहल घडवण्यात आली. या ठिकाणी उभारलेली राधानगरी धरणाची प्रतिकृती, राजर्षि शाहू महाराजांची बग्गी यासह विविध गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपाचे अध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, गायत्री राऊत, विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, किरण नकाते, प्रदिप उलपे, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे, उदय शेटके, संग्राम निकम, शैलेश पाटील, युवराज माने, विराज चिखलीकर, डॉ. सदानंद राजवर्धन, संग्राम जरग, अमोल पालोजी, महेश वासुदेव, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, विशाल शिराळकर, अमर साठे, रवीकिरण गवळी, अमित पसारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राजर्षि शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केले. लोककल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या शाहू महाराजांमुळे करवीर नगरीचे नाव उंचावले. त्यांचा आदर्श घेवून संपूर्ण महाराष्ट्राची वाटचाल सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान याच वास्तूमधील एका छोटेखानी थिएटरमध्ये राजर्षि शाहू महाराजांवरील ध्वनी चित्रफित सादर झाली. तर होलोग्राफीक शो द्वारे प्रत्यक्ष राजर्षि शाहू महाराज आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होत होता. यावेळी हेमंत आराध्ये, डॉ. सदानंद राजवर्धन, विशाल शिराळकर, संग्राम जरग, विजय अग्रवाल, सचिन पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान श्रम फौंडेशनच्यावतीने, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, महापुरूषांवर लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सारंग, वैशाली सारंग, पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, सतिश माने उपस्थित होते.