शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन...; ▪️राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वर दडपशाही करू नये; आमदार सतेज पाटील....
schedule26 Jun 25 person by visibility 160 categoryराज्य

▪️मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये; आमदार सतेज पाटील यांचा इशारा...
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शक्तीपीठ विरोधात एक जुलैला सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तर राज्य सरकारने दडपशाही करू नये. आणि पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. असे आवाहन या बैठकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
▪️नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते. त्याच बरोबर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी ऑनलाइन सहभागी झाले होते.
शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं, शेतकऱ्यांच्यात उद्रेक असून, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना या बैठकीत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आमदार सतेज पाटील यांनी, पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाबद्दल आम्ही अधिवेशनात आवाज उठवू. मात्र आता रस्त्यावरची लढाई देखील करावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आता जिल्ह्यात जाऊन जनजागृती करुया.
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया हाणून पाडूया. राज्य सरकारनं शेतकऱ्यावर दडपशाही करू नये. तर शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला. याशिवाय, एक जुलै रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येन शेतकऱ्यांनी सहभागी होऊन रस्त्यावरची ही लढाई यशस्वी करण्याच आवाहनही त्यांनी या बैठकीच्या निमित्तान केला.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी, राज्य सरकारला वठणीवर आणायच असेल तर, संघर्ष अधिक तीव्र करूया. रस्त्यावरच्या लढाई शिवाय पर्याय नसून एकीकडे एक जुलैला राज्य सरकार कृषी दिन साजरा करत असेल आणि दुसरीकड शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार हिराऊन घेणार असेल, तर सरकाराला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊया. असं आवाहन त्यांनी केलं. खासदार विशाल पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावरच्या लढाईत शेतकऱ्यांच्या सोबत आपणं असणार आहे.. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन एक जुलै रोजी होणारे चक्काजाम आंदोलन अधिक ताकतीन करण्याबाबत नियोजन करण्याच आश्वासन त्यांनी दिल. आमदार विश्वजीत कदम यांनी, शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन, हा लढा अधिक तीव्र करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार कैलास पाटील यांनी , शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना सामावून घेऊया. सरकारला तरुण शेतकऱ्यांची ताकद देखील दाखवून देण्याच आवाहन त्यांनी केल.
यावेळी, धाराशिव नगर येथील शेतकरी अँड गजेंद्र येळकर, नांदेड जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी, गोविंद घातोळ, महेश खराडे, डॉक्टर सुधीन दळवे, गणेश घोडके, एडवोकेट वीरेंद्र फोंडके आदी शेतकऱ्यांनी या बैठकीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, बापूराव ढोरे, अजय बुरांडे, अभिजित देशमुख, गणेश घोडके, उमेश एडके, अभिजीत देशमुख, दिगंबर कांबळे, शिवाजी मगदूम, प्रकाश पाटील, कृष्णा पाटील शिवाजी कांबळे अशा विविध जिल्ह्यातील शेतकरी या बैठकीला ऑनलाइन सहभागी झाले होते.
▪️पोलिसांनी हस्तक्षेप करू नये...
मोजणीला काही, अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतावर जात आहेत. शेतकऱ्यांचा मोजणीला विरोध होत असताना, पोलीस शेतकऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करत आहेत. काही शेतकऱ्यांना दिवस दिवसभर पोलीस ठाण्यामध्ये थांबवून ठेवले जाते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.