SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्तप्रलंबित बिलांमुळे ठेकेदार आर्थिक संकटात; राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशाराडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया; ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पारगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कारअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावाजागतिक रक्तदाता दिन: माणुसकीच्या रक्ताचे नाते!भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

प्रलंबित बिलांमुळे ठेकेदार आर्थिक संकटात; राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशारा

schedule14 Jun 26 person by visibility 190 categoryसामाजिक

▪️कोल्हापूर येथे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या अधिवेशनात ठेकेदारांचा संताप व्यक्त

कोल्हापूर : महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडील प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर आज कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यभरातील सुमारे १२०० ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या अधिवेशनात शासनाने तातडीने प्रलंबित बिले अदा करावीत, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष  व्ही. के. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा काँट्रॅक्टर असोसिएशन चे अध्यक्ष  किशोर जामदार यांनी केले, तर मा.एन. डी. बापू लाड यांनी फेडरेशनची आवश्यकता, उद्दिष्टे आणि राज्यातील ठेकेदारांना एकत्र आणण्यामागील भूमिका स्पष्ट केली.अधिवेशनास पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पाठिंबा दर्शवला.

  यानंतर झालेल्या तांत्रिक सत्रात सार्वजनिक बांधकाम, जल जीवन मिशन, जलसंपदा, जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास विभागांतील अडचणी व प्रलंबित देयकांचे प्रश्न मांडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत  बाबा गुंजाटे, जल जीवन मिशनबाबत बाळासाहेब जाधव, जलसंपदा व जलसंवर्धन विभागाबाबत  प्रशांत शेलार, तर ग्रामीण विकास विभागातील अडचणी व तांत्रिक प्रश्नाबाबद  सोहन दळवी यांनी सविस्तर  व मुद्देसूद मांडणी केली.

चर्चासत्रादरम्यान अनेक मोठ्या तसेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांनी प्रलंबित बिलांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीची व्यथा मांडली. बँकांचे कर्ज, वाढते व्याज, जीएसटी, मजुरीची देणी आणि साहित्य पुरवठादारांची थकबाकी यामुळे अनेक ठेकेदार आर्थिकदृष्ट्या कोलमडल्याचे सांगण्यात आले. काही ठेकेदारांनी तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक जण आत्महत्येच्या मानसिकतेपर्यंत पोहोचल्याच्या भावना व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व विभागांची प्रलंबित देयके अदा करावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

 अन्यथा राज्यातील सर्व ठेकेदार संघटनांना एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा अधिवेशनातून देण्यात आला.

  यावेळी अखंड महाराष्ट्रातील ठेकेदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन स्थापनेचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नवीन फेडरेशनच्या माध्यमातून ठेकेदारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित आणि प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

 या अधिवेशनासाठी सर्व तालुक्याचे पदाधिकारी तसेच सुकाणू समितीचे प्रमुख विजय सावंत,बी एस पाटील,संजय पाटील,किरण माळी,प्रशांत कदम,निलेश पाटील,विशाल मोरे,दयानंद शिंदे,संदीप सावंत,कुलदीप पाटील,अनुप देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार जेष्ट ठेकेदार सुनील नगराळे  यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes