SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"कोल्हापूर हायकर्स" ची "दीपोत्सव" सायंकाळ उत्साहात कोल्हापूर महापालिकेच्यावतीने तावडे हॉटेल परिसरातील 11 अतिक्रमणावर कारवाई‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ...स्टार्टअप्सनी भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. सी. एस. यादव; केआयटी आय.आर.एफ. च्या कोहॉर्ट-२.0 या उपक्रमाचे उद्‌घाटननांदगाव येथे कृषी विषयक ग्राम परिसंवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनशाही दसरा महोत्सव: विजेत्यांना बक्षीस वितरण, उत्कृष्ट कामांचाही सन्मानआरटीओकडून कारवाईपोटी 2 लाखाचा दंड वसूलजांभळी गावाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास प्रशासनाची परवानगीमाफक दरात, सुंदर कलाकृतींचा लाभ नागरिकांनी घ्यावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

कोल्हापुरात ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात स्वामी भक्तांचा महामोर्चा, निदर्शने; महाराव यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

schedule20 Sep 24 person by visibility 1248 categoryसामाजिक

कोल्हापूर : ठाणें-मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. या टीकेचा निषेध करत महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापुरातील सर्व स्वामी समर्थ भक्ताकडूंन आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो स्वामी भक्त सहभागी होते. महिला स्वामी भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या बद्दल देखील आक्षेपार्ह विधान केले. तसेच श्री संत गाडगे महाराज व संत श्री तुकाडोजी महाराज यांच्या कार्यावर सुध्दा आक्षेप घेतला. महाराव यांनी केलेल्या टीकेमुळं श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय. आज शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता ऐतिहासिक दसरा चौकात सर्व. स्वामी भक्तांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.

मोर्चामध्ये भजनी मंडळे, टाळ, मृदुंग, निषेधार्थ फलक, भगवे झेंडे, भगव्या टोप्या घालून भक्त मोठ्या संख्येने सामील झाले होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा गजर करत भक्त उन्हाचा तडाखा असूनही शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते.

यावेळी भक्तांनी महाराव यांच्या विरोधात कोण म्हणते महाराव... हा तर एक महाभाग... कावळा करतो काव काव... चोपून काढा महाराव... जाहीर निषेध... जाहीर निषेध... विकृत प्रवृतीचा जाहीर निषेध. ह्या मुर्खाला अटक करा. मुर्खाचा महाराव, करोडो लोकांच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असे फलक लोकांनी हातात घेतले होते.

व्हीनस कार्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर काही वेळ स्वामींच्या घोषणा देत प्रमुख आयोजकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना महाराव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्वामी भक्त सुहास पाटील, तर मोर्चाचे नियोजन धनंजय महिंद्रकर सांगितले. निवेदन वाचन कुलदीप जाधव यांनी केले. तर अरुण गवळी यांनी आभार मानले.

या मोर्चाचे आयोजन अरुण गवळी, कुलदीप जाधव, प्रथमेश माळी, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, अमोल कोरे, गुरुदेव स्वामी, अभिनंदन शिंदे, ॲड.भाग्यश्री पाटील आदी भक्तांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes