SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहिती

जाहिरात

 

वि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात

schedule17 Mar 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विद्यार्थिनींमध्ये वाचनाची संस्कृती रुजणे आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या हॉस्टेल डे कार्यक्रमात ते बोलत होते.
हॉस्टेल डेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी (दि. १५) पार पडला. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी, विद्यार्थिनीना आयुष्यात ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे विचारमूल्य डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थिनींनी आपले भविष्य घडवावे, असे मत व्यक्त केले.

 यावेळी उपकुलसचिव प्रिया देशमुख यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेत अपयश आले, तरी चांगली मेहनत करून संकटावर मात करावी आणि आयुष्य घडवावे असे आवाहन केले. हॉस्टेल डे निमित्त फुगडी, गायन, एकांकिका इत्यादी वेगवेगळ्या १९ सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. कविता वड्राळे यांनी अहवाल वाचन केले. विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. मीना पोतदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. नीलांबरी जगताप, वॉर्डन, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes