SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशएसआयआर मोहिमेला मुदतवाढ द्या; सतेज पाटील यांची मागणी शैक्षणिक गुणवत्तेत कोरे डिप्लोमाची पुन्हा एकदा बाजी; महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 'अतिशय उत्कृष्ट' मानांकनपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू

जाहिरात

 

डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

schedule19 May 26 person by visibility 284 categoryक्रीडा

कोल्हापूर  : सांगली येथे झालेल्या २० व्या कै. सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती महिला खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत  डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, कोल्हापूरची विद्यार्थिनी महिमा मिलिंद शिर्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख रुपये १२,५००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. महिमाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,  विश्वस्त ऋतुराज पाटील,  विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी या यशाबद्दल महिमाचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes