SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवाडी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्नस्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठरावनवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

जाहिरात

 

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभ

schedule09 Jul 26 person by visibility 120 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता व कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान नवनिर्वाचित सदस्यांना व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचा पहिला दिवस आज रेसिडेन्सी क्लब येथे उत्साहात पार पडला.

 

  कार्यशाळेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सभाशास्त्र व सभांचे कामकाज, महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी, महापौर, उपमहापौर, सभापती व नगरसेवकांचे अधिकार व जबाबदाऱ्या, अतिक्रमण निर्मूलन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

  यावेळी बोलताना महापौर सौ.रुपाराणी निकम म्हणाल्या, नगरसेवक हा जनतेचा थेट प्रतिनिधी असतो. प्रशासकीय कायदे व नियमांचे सखोल ज्ञान असल्यास जनतेची कामे अधिक प्रभावीपणे व वेगाने करता येतात. हे प्रशिक्षण शहराच्या विकासकामांना निश्चितच गती देईल.

 

  प्रशिक्षण सत्रात निवृत्त उपआयुक्त तथा मानद संचालक लक्ष्मण लटके, पिंपरी-चिंचवडचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदुलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सदस्यांच्या प्रश्नांचे निरसनही त्यांनी केले.

 

  याप्रसंगी महापालिका उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, नगरसचिव सुनिल बिद्री, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, संजय मोहिते, अनुराधा खेडकर, विशाल चव्हाण, गटनेते शारंगधर देशमुख, इंद्रजीत बोंद्रे, आदिल फरास, सौ.प्रतिज्ञा उत्तूरे, नगरसेवक व नगरसेविका मोठया संख्येने उपस्थित होते.

 

  दुसरे प्रशिक्षण सत्र शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासन व नागरिकांतील समन्वय, महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीचे पर्याय तसेच ७४ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी या विषयावर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes