राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवारांची भेट घेऊन केले सांत्वन
schedule28 Jan 26 person by visibility 102 categoryसामाजिक
बारामती : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारत येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण पाटील, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह लोकप्रतिनिधी,
विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी खासदार श्री. पवार यांची भेट घेवून सांत्वन केले.