शिवाजी विद्यापीठाची राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगित
schedule28 Jan 26 person by visibility 63 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे येत्या २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगित करण्यात आली आहे, असे अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी कळविले आहे.
सदर संगीत रजनीसंदर्भातील पुढील नियोजन यथावकाश कळविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.