SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस: धरणांच्या पाणीपातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखालीजगातील पहिली मानवी शक्तीवर आधारित पृथ्वी प्रदक्षिणादिल्ली हादरली: 'कॉकरोच जनता पार्टी'चा संसद मार्च हिंसकअजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला गुणवंतांची पहिली पसंती‘त्या’ ४१० दूध संस्थाबाबत सहानूभूतीपुर्वक विचार करा - महाडीक, नरके, जाधव , घाटगे यांनी केली प्रशासकांकडे मागणीशिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि पेपरफुटीचा भडका: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा; शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चाराज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबई हवामान विभागाचा ५ दिवसांचा सुधारित अंदाजआंबेओहळ प्रकल्पातील पुनर्वसन १०० टक्के पूर्ण होणार : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

दिल्ली हादरली: 'कॉकरोच जनता पार्टी'चा संसद मार्च हिंसक

schedule20 Jul 26 person by visibility 345 categoryदेश

नवी दिल्ली : २० जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी उग्र रूप धारण केले. 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) ने पुकारलेल्या संसद मार्चदरम्यान दिल्लीत मोठा गदारोळ झाला. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण झटापटीत ५० पेक्षा जास्त पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता तपास यंत्रणांच्या मदतीने यामागील  सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे.

जंतर-मंतरवरून निघालेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी जंतर-मंतर परिसराचा ताबा घेत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सीजेपीनेही आपल्या कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे.


संसदेच्या अत्यंत सुरक्षित भागात वीट-दगड कुठून आले, हा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. जंतर-मंतरजवळ दगडांनी भरलेला एक ट्रक सापडल्याने, हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, आंदोलकांना बाहेरून व्हॉट्सॲप मेसेजद्वारे सूचना मिळत होत्या, असेही तपासात पुढे आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes