SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस: धरणांच्या पाणीपातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखालीजगातील पहिली मानवी शक्तीवर आधारित पृथ्वी प्रदक्षिणादिल्ली हादरली: 'कॉकरोच जनता पार्टी'चा संसद मार्च हिंसकअजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला गुणवंतांची पहिली पसंती‘त्या’ ४१० दूध संस्थाबाबत सहानूभूतीपुर्वक विचार करा - महाडीक, नरके, जाधव , घाटगे यांनी केली प्रशासकांकडे मागणीशिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि पेपरफुटीचा भडका: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा; शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चाराज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबई हवामान विभागाचा ५ दिवसांचा सुधारित अंदाजआंबेओहळ प्रकल्पातील पुनर्वसन १०० टक्के पूर्ण होणार : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभ

schedule20 Jul 26 person by visibility 318 categoryसामाजिक

▪️मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयात होणार कार्यक्रम 
▪️पत्रकार विजय चोरमारे यांचे होणार व्याख्यान
         
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाची सुरुवात बुधवारी दि. २२  होणार आहे. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्केट यार्डमधील कार्यालयात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अभिवादन दिवंगत  अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. तसेच; पत्रकार विजय चोरमारे यांचे "महाराष्ट्राच्या जडणघडणीत अजितदादा पवार यांचे योगदान" या विषयावर होणार व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 
                  
या पत्रकात  आसुर्लेकर- पाटील यांनी पुढे म्हटले आहे, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि. २२ जुलैपासून कोल्हापूर जिल्ह्यात जनसेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात आरोग्य, स्वच्छता, समाज प्रबोधन आदी लोकोपयोगी उपक्रम केले जाणार आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष  आसुर्लेकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes