SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केआयटीच्या वतीने नूतन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे उत्साहपूर्ण स्वागतमंत्री हसन मुश्रीफ यांना बकरी ईदनिमित्त मान्यवरांसह नागरिकांच्या शुभेच्छा.....! मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी शेतकऱ्यांसमवेत करणार शिवारफेरीरेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल; सीझन सहाचा भव्य आणि दिमाखदार समारोप​"त्याग आणि समर्पण: स्वतःमधील दुर्गुणांची कुरबानी हाच खरा धर्म"जागतिक व्यासपीठावर महिलांच्या आरोग्य हक्कांचा जागर: आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनड्रग्जचा प्रादुर्भाव हा 'नार्को-टेररिझम'चा भाग; भाजयुमोची पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहिमेची मागणी!कोल्हापूर आय.टी. पार्कचा ताबा एमआयडीसीकडे सुपूर्तऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​पाणी जपून वापरा! काळम्मावाडी सबस्टेशनच्या कामामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

जाहिरात

 

मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी शेतकऱ्यांसमवेत करणार शिवारफेरी

schedule28 May 26 person by visibility 92 categoryउद्योग

◼️करनूरमध्ये ऊस शेतीमधील ए. आय. तंत्रज्ञानावर चर्चासत्र व कार्यशाळा     
◼️सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आयोजन

करनूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी दि. ३० शेतकऱ्यांसमवेत शिवारफेरी करणार आहेत. करनूर ता. कागल येथे  ऊस शेतीमधील ए. तंत्रज्ञानावर चर्चासत्र होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट- पुणे व कृषी विज्ञान केंद्र- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
          
या चर्चासत्रात ऊस पिकातील आधुनिक प्लॉट विकास, ए आय तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. 
         
यावेळी युवराज पाटील, प्रताप ऊर्फ भैय्या माने, नविद मुश्रीफ हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
       
डॉ. तुषार जाधव हे “ऊस पिकात ए आय तंत्रज्ञानाचा वापर व महत्त्व”तर अरुण देशमुख हे “ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन” तसेच विनय पोळ हे “ए आय तंत्रज्ञानामध्ये जिवाणू खतांचे महत्त्व” या विषयांवर माहिती देणार आहेत.

दरम्यान, सकाळी १० वाजता प्रत्यक्ष ऊस शेतीमध्ये वापरलेल्या ए. आय.  तंत्रज्ञानाचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी शिवार फेरीने कार्यशाळेला सुरुवात होणार आहे.  सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत चर्चासत्र होईल. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes