मंत्री हसन मुश्रीफ यांना बकरी ईदनिमित्त मान्यवरांसह नागरिकांच्या शुभेच्छा.....!
schedule28 May 26 person by visibility 130 categoryसामाजिक
कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांसह नागरिकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.
आज शुभेच्छा दिलेल्यांमध्ये माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, प्रकाशराव गाडेकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, अरुणराव डोंगळे, युवराज पाटील, बाळासाहेब खाडे, अजित नरके, करणसिंह गायकवाड, अमरीशसिंह घाटगे, एस. आर. पाटील, किसन चौगुले, रणजीतसिंह पाटील, अमर पाटील यांचा समावेश आहे.
तसेच; कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब कांबळे, राजे विक्रमसिंह कागल को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष एम. पी. पाटील- बामणीकर, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, भूषण पाटील, जयंत पाटील- कासारीकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, शिरीष देसाई, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, प्रवीणसिंह भोसले, ए. वाय. पाटील -म्हाकवेकर, के. के. पाटील आदींनी भेटून शुभेच्छा दिल्या.
◼️उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या फोनवरून शुभेच्छा....!
मंत्री मुश्रीफ यांना बकरी ईद निमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्राताई पवार वहिनी, प्रफुल पटेल, सुनील तटकरे तसेच; शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.....!