SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कणेरी मठाच्या पावन भूमीत कृषी महाविद्यालयाच्या 'श्रमसंस्कार' शिबिराचा समारोप!पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेअमृत संस्थेच्या वतीने १५ मार्च रोजी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावाशिक्षणशास्त्र अधिविभागात महिला दिन साजराडॉ. देवानंद शिंदे, अनिता शिंदे यांना ‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कारकरवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापतीपद भाजपकडेप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यशाळा उत्साहात सोनं बनावट, पण बेड्या खऱ्या! युनियन बँकेला गंडवणारा ठकसेन आता कोठडीतस्त्री शिक्षणाची धगधगती मशाल: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले12 व 13 मार्च रोजी आयटीआयमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह; उमेदवारांना नोकरीची संधी

जाहिरात

 

करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापतीपद भाजपकडे

schedule10 Mar 26 person by visibility 167 categoryराजकीय

कोल्हापूर  :  काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने 24 पैकी तब्बल 16 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7, भारतीय जनता पक्षाने 6 तर शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता.

आज पार पडलेल्या निवडीवेळी सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताप्पा धोंडीराम पाटील तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून तर दिपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत.


नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका घेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन केला होता. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापतीपदी भाजपच्या दिपाली पाटील यांना संधी मिळाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes