SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : छगन भुजबळजिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकणेरी मठाच्या पावन भूमीत कृषी महाविद्यालयाच्या 'श्रमसंस्कार' शिबिराचा समारोप!पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेअमृत संस्थेच्या वतीने १५ मार्च रोजी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावाशिक्षणशास्त्र अधिविभागात महिला दिन साजराडॉ. देवानंद शिंदे, अनिता शिंदे यांना ‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कारकरवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापतीपद भाजपकडेप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यशाळा उत्साहात

जाहिरात

 

शिक्षणशास्त्र अधिविभागात महिला दिन साजरा

schedule10 Mar 26 person by visibility 102 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार ‘महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती’ या विषयावर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी, ‘महिलांनी सक्षम, सुदृढ व आत्मनिर्भर असणे गरजेचे असल्याचे अध्यक्षीय मनोगतात सांगितले.

 यावेळी येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या माजी प्राध्यापक डॉ. विदुला स्वामी प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी झाडांची प्रतिज्ञा, प्लास्टिक कचरामुक्तीसाठी आपले काम, स्टील बँक, प्रश्नमंजुषा, कल्की डेमो, पिरियड पॅन्टीज प्रबोधन, पर्यावरण संरक्षण शपथ याद्वारे प्रबोधन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन, कविता व चित्रफितीद्वारे महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान याविषयी सादरीकरण केले. महिला दिनाचे औचित्य साधून विभागातील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ.विजय सदामते, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, कादंबरी खांडेकर, ऋतिका धनगर, साबिया बागवान, आनंद कुंभार, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, अतुल जाधव  उपस्थित होते. राजनंदिनी व रुचिता थरोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिक्षा पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes