SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमांचे उद्घाटन; प्राणिशास्त्र अधिविभागात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसादसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनकोल्हापूर : पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 64 कनेक्शन व 33 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाईमाझं शहर माझी जबाबदारी’ अंतर्गत शुक्रवारी शहरात महास्वच्छता मोहीमभागीरथी महिला संस्था आणि शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे कार्यशाळा उत्साहात, विविध वस्तू बनवण्याचे महिलांना प्रशिक्षणकोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला 'महानिर्यात इग्नाईट'ची साथ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्यात वाढीसाठी उद्योजकांना आवाहनबेळगावी येथे DSC भरती रॅलीचे आयोजनइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मानसमावेशन आणि शाश्वततेची कास धरल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. एस. महेंद्र देवडीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात; गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमांचे उद्घाटन; प्राणिशास्त्र अधिविभागात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

schedule26 Feb 26 person by visibility 79 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील प्राणिशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिन-२०२६ चा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. " Women in Science: Catalysing Viksit Bharat " या विषयावर आधारित तीन दिवसीय कार्यक्रमांची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात झाली. प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, एम.एस्सी. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या समन्वयीका प्रा. (डॉ.) एम. व्ही. वाळवेकर यांनी प्रस्तावनेतून राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच कार्यक्रमाचे स्वरूप व नियोजन जाहीर केले. या वर्षी विविध स्पर्धासाठी एकूण १५६ स्पर्धकांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ६६ निबंध, २६ प्रश्नमंजुषा, ३४ ई-पोस्टर, ६ कोलोकीयम, ११ वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेचा समावेश आहे. 

प्रमुख पाहुणे डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आपल्या भाषणात वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व, नवकल्पनांची गरज आणि विद्यार्थ्यांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका अधोरेखित केली. विद्यापीठातील महिला, विद्यार्थिनींनी संशोधन क्षेत्रातअधिक लक्ष केंद्रित करून नोबेल पारितोषिकापर्यंत मजल मारण्याचे ध्येय ठेवावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून जिद्द, शिस्त आणि नेतृत्वगुण आत्मसात करावेत, असे मार्गदर्शन केले. विज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान नमूद करत त्यांनी कमला सोहनी आणि जानकी अंमल यांच्या कार्याचा उल्लेख केला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. (डॉ.) एस. आर. यंकंची यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

तीन दिवसीय कार्यक्रमांतर्गत आयोजित स्पर्धांसाठी पुढील प्रमाणे समन्वयक कार्यरत आहेत : वक्तृत्व - प्रा. एम. पी. दांडगे, रांगोळी - डॉ. जे. पी. खराडे, प्रश्नमंजुषा डॉ. के. एस. ओझा व प्रा. जी. एस. राशिनकर विज्ञान कोलोकीयम - प्रा. व्ही. डी. जाधव व डॉ. एस. ए. पाटील, निबंध डॉ. ए. एस. जाधव, ई-पोस्टर डॉ. वैशाली सावंत.


या कार्यक्रमास प्रा. अ. अ. देशमुख, प्रा. एन. ए. कांबळे, प्रा. एस. एम. गायकवाड, प्रा. एम. पी. भिलावे, डॉ. ए. डी. गोफणे, डॉ. ए. एस. लोखंडे यांच्या सहसंशोधक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. एन. ए. कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सानिका हेबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर अपर्णा पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes