SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमांचे उद्घाटन; प्राणिशास्त्र अधिविभागात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसादसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनकोल्हापूर : पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 64 कनेक्शन व 33 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाईमाझं शहर माझी जबाबदारी’ अंतर्गत शुक्रवारी शहरात महास्वच्छता मोहीमभागीरथी महिला संस्था आणि शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे कार्यशाळा उत्साहात, विविध वस्तू बनवण्याचे महिलांना प्रशिक्षणकोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला 'महानिर्यात इग्नाईट'ची साथ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्यात वाढीसाठी उद्योजकांना आवाहनबेळगावी येथे DSC भरती रॅलीचे आयोजनइंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मानसमावेशन आणि शाश्वततेची कास धरल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. एस. महेंद्र देवडीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात; गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

schedule26 Feb 26 person by visibility 95 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले.

स्पर्धांमध्ये ‘इनोव्हाट्रिक्स’, ‘आयडीया पिचिंग स्पर्धा’, ‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’, ‘पोस्टर एक्स प्रो’ आणि ‘टेक रोबस्टा’ या प्रमुख विभागांचा समावेश आहे. ‘इनोव्हाट्रिक्स’ अंतर्गत ‘सर्किट्रिक्स’ आणि ‘इनोव्हेटर्स अरेना’ होणार असून, एक किंवा दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.

‘आयडीया पिचिंग’ स्पर्धेत समस्या मांडणी, प्रस्तावित उपाययोजना, लक्ष्यित बाजारपेठ, उत्पन्न मॉडेल तसेच नाविन्य आणि विस्तारक्षमता यांचा समावेश असलेले सादरीकरण अपेक्षित आहे. या स्पर्धेत कमाल चार सदस्यांच्या गटांना सहभाग देता येणार आहे.

‘‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’ अंतर्गत ग्रँड प्रिक्स ऑफ कोड, ब्लाइंड कोडिंग अरेना, पिक्सेल फिक्स, स्क्विड हंट, ई-स्पोर्ट्स (बीएमआय), ई-स्पोर्ट्स   (फ्री फायर) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘पोस्टर एक्स प्रो’ मध्ये सस्टनेबल अँड ग्रीन कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री 4.0 अँड ऑटोमेशन, 5जी  कमुनिकेशन  सिस्टीम, वायरलेस कम्युनिकेशन: फ्युचर नेटवर्क आर्किटेक्चर, आर्टिफिशियल इंटीजिलेन्स आणि स्मार्ट सिटी या विषयांवर सादरीकरण होणार आहे. ‘टेक रोबस्टा’ अंतर्गत वळणदार मार्ग, गतीरोधक, बोगदे आणि उतार असलेल्या मार्गावर यंत्रमानव शर्यत आयोजित करण्यात आली असून, दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.

प्रत्येक स्पर्धेसाठी प्रति सहभागी नाममात्र प्रवेश शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विजेत्यांना प्रायोजकाकडून आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संबंधित विद्यार्थी समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes