तंत्रज्ञान हीच आजची लेखणी : मनीषकुमार गुप्ता; हिंदी विभागात ‘आयसीटी’वर राष्ट्रीय चर्चासत्र
schedule21 Jan 26 person by visibility 48 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आधुनिक काळात तंत्रज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात आणखी अमूलाग्र बदल घडविणे महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची तंत्रज्ञान हीच आजची लेखनी आहे. त्याचा वापर सावधानतेने केले पाहिजे, असे मत ‘सी-डॅक’चे शास्त्रज्ञ मनीषकुमार गुप्ता यांनी व्यक्त केले.
ते शिवाजी विद्यापाठाच्या हिंदी विभागात ‘पीएम उषा’ सॉफ्ट कॉम्पनंट योजनेअंतर्गत मंगळवारी ‘भाषा प्रयोग एवं अध्यापन में आयसीटी’ विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रथम सत्राच्या प्रमुख पाहुण्या ओडिसा येथील सेंच्युरियन यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंटच्या प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा पाणी होत्या. त्या म्हणाल्या की, आपण अध्यापन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. एआयच्या माध्यमातून आपण डेटावर प्रक्रिया करून ऑडियो-वीडियो, ग्राफ, पीपीटी काहीही एक क्षणात बनवू शकतो.
दुसरे प्रमुख वक्ते पाँडेचरी विद्यापीठाचे डॉ. सी. जयशंकर बाबू यांनी भाषा विकासात तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकतो, तसेच आयसीटीच्या माध्यमातून आपण लुप्त होत चाललेल्या भाषांचे व बोलींचे कशाप्रकारे संरक्षण करू शकतो, यासंदर्भात माहिती दिली. तसेच प्रत्येक भाषेसाठी ‘लँग्वेज लॅब’ असावी असेही मत व्यक्त केले. प्रथम सत्राच्या अध्यक्षा संगणक विभाग प्रमुख डॉ. कविता ओझा होत्या. त्यांनाही आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान कसे महत्त्वाचे आहे व अध्यापन क्षेत्रात वाढत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उपयोगासंदर्भात माहिती दिली.
चर्चासत्राचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले. पाहुण्यांची ओळख राणी नलवडे व डॉ. प्रकाश मुंज यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ. सुषमा चौगले व डॉ. गीता दोडमणी यांनी केले. आभार डॉ. अक्षय भोसले व डॉ. अनिल मकर यांनी मानले. यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. प्रतीक्षा ठुंबरे, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.