छत्रपती शिवाजी महाराज सर्टिफिकेट कोर्सला संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule21 Jan 26 person by visibility 58 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : सफरनामा ट्रॅकर्स, कोल्हापूर व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज सर्टिफिकेट कोर्सचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या कोर्समध्ये एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सीबीएससी स्कूलमधील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास,शौर्य, पराक्रम समजावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सफरनामा ट्रॅकर्सचे अध्यक्ष रोहन भंडारे यांचे बहुमोल सहकार्य या उपक्रमात लाभले.
या उपक्रमाच्या अभ्यासक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्युपर्यंतचा सविस्तर इतिहास सांगणारी एकूण 10 व्याख्याने तीन महिन्याच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. शिवव्याख्याते रामकृष्ण सर्जेराव शेणेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लाभले. तसेच विद्यार्थ्यांना शिवचरित्रावरील साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले. कोर्सच्या शेवटी ५० गुणांची वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असलेली लेखी परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेण्यात आली.
तसेच या उपक्रमांतर्गत पन्हाळागड मोहीमही राबविण्यात आली. यावेळी गडाचा इतिहास, रचना व महत्त्व यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पालकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त दाद दिली.
या उपक्रमाचे संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी कौतुक केले असून, भविष्यात अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्य सास्मिता मोहंती यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवाजी महाराज सर्टिफिकेट कोर्स लेखी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे :
लहान गट – १ : प्रत्येश योगेश साळवी
२ : शरण्या मंदार कोकडवार
३ : साक्षी चंद्रकांत लोहार
मोठा गट : 1: शौर्य अभय घोरपडे,
2: हर्षवर्धन सागर पाटील,
3: विभागून -उदयनराजे संतोष भोसले, समृद्धी सूर्यकांत साळुंखे
या सर्टिफिकेट कोर्समुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभ्यासपूर्ण दृष्टिकोन व राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण झाल्याचे मत प्राचार्य डॉ. एच एम नवीन यांनी व्यक्त केले.