मतदान पथक प्रशिक्षणामुळे शुक्रवारी शाळा सकाळी भरणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
schedule21 Jan 26 person by visibility 67 categoryराज्य
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीचे मतदान दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावणाऱ्या मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील अधिकारी व कर्मचारी—मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी—यांचा समावेश आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे त्या दिवशी संपूर्ण दिवस शाळा नियमितपणे भरविणे शक्य नसल्याने, शुक्रवार, 23 जानेवारी रोजी माध्यमिक व प्राथमिक शाळा सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेतच भरवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.