राष्ट्रीय खेळाडू पैलवान रोहन पवार यांचा शिवाजी विद्यापीठात सत्कार
schedule20 Aug 25 person by visibility 90 categoryराज्य

कोल्हापूर : रांची (झारखंड) येथे २२ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणाऱ्या २३ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कुस्ती संकुलातील पैलवान रोहन पवार याची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या वतीने निवड झाली आहे.
सदर यशस्वी निवडीबदल त्याचे शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आयक्यूएसी संचालक डॉ सागर डेळेकर, प्रा. किरण पाटील उपस्थित होते.
पैलवान रोहन पवार यास वस्ताद विश्वास हारूगले तसेच एन.आय. एस. कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.