SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रदुर्ग मठामध्ये एक कुटुंब स्थलांतरीतमुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी"बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना" : अच्युत गोडबोलेसंसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत भुमिकापक्ष प्रवेश मुहूर्त ठरला! राहुल पाटील यांचा अजित पवार गटात होणार प्रवेशकोल्हापुरात सदभावना दौडच्या माध्यमातून राजीव गांधी यांना अभिवादन, काँग्रेसच्या वतीने दौडचे आयोजनराष्ट्रीय खेळाडू पैलवान रोहन पवार यांचा शिवाजी विद्यापीठात सत्कारडी. वाय. पाटील आर्किटेक्चर, तळसंदेचा राहुल गोडबोले शिवाजी विद्यापीठात प्रथमकोल्हापूर शहरात सापडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी संपर्क करावाप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव

जाहिरात

 

कोल्हापूर शहरात सापडलेल्या मुलाच्या नातेवाईकांनी संपर्क करावा

schedule20 Aug 25 person by visibility 150 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात विविध ठिकाणाहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा, नातेवाईकांचा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, बाल कल्याण समिती, कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांच्याकडून शोध सुरु असून या बालकांच्या पालक नातेवाईकांनी दिलेल्या दूरध्वनी, मोबाईल वर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष येवून भेटावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी केले आहे.

बाल कल्याण समिती, कोल्हापूर यांच्या व्दारे एक अल्पवयीन मुलाला काळजी च संरक्षणाची गरज असल्याने त्यांना श्री दिलीपसिंह राजे घाटगे बालग्राम एस. ओ. एस. पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दाखल केले आहे. हे बालक जिल्ह्यातील सखी संघठनमार्फत समिती समोर हजर करण्यात आले होते. या बालकाच्या आईचा मृत्यू झाला असून त्यानंतर बालकाच्या कोणत्याही नातेवाईकांनी संपर्क केला नाही किंवा भेटायला आले नाहीत. या बालकास नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यासाठी बालकाच्या नातेवाईकांनी अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती, कोल्हापूर,  दिलीपसिंह राजे घाटगे बालग्राम एस. ओ. एस. पन्हाळा, ता. पन्हाळा 9921410749 किंवा चाईल्ड लाईन, कोल्हापूर यांच्याशी दिलेल्या फोन नंबरवर 99923068135, 112,0231-2646600 वर 30 दिवसांच्या आत संपर्क करावा, असे आवाहन  वाईंगडे यांनी केले आहे.

▪️राजू तानाजी घाटगे (वय 16 वर्ष 6 महिने)

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes