SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर हादरले! भररस्त्यात कुख्यात गुंडावर गोळीबार; शहरात खळबळपरवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सीलई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आप ने काढली गाडीची अंत्ययात्रा विश्वचषकात 'मेसी'मॅजिक! अंतिम ७ मिनिटांत अर्जेंटिनाचा थरारक विजय; फायनलमध्ये स्पेनशी होणार गाठजागतिक पाळीव प्राणी दिन: मुक्या जीवांचे प्रेम आणि आपले भावनिक नातेराष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा जिल्ह्याला मानप्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाईअनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडमाळकर तिकटी, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाईशिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद

जाहिरात

 

कोल्हापूर हादरले! भररस्त्यात कुख्यात गुंडावर गोळीबार; शहरात खळबळ

schedule16 Jul 26 person by visibility 269 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील रंकाळा परिसरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुन्हेगार सुरज साखरे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळीबार केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड परिसरात, नाना पाटील चौकाजवळ सुरज साखरे आपल्या वाहनातून जात असताना ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी साखरेच्या दिशेने सहा गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या त्याला लागल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस तपास सुरू
या हल्ल्यात सुरज साखरे जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB), करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासोबतच, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला—यामागे जुन्या वैमनस्याचा टोळीसंघर्षाचा संबंध आहे का, किंवा इतर कोणताही हेतू आहे का—याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes