+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना adjust'गोकुळ’ मध्ये योग दिन उत्साहात साजरा... adjustज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय समितीचे काम महत्त्वपूर्ण : सहायक आयुक्त सचिन साळे adjustराधानगरी धरणात 2.19 टीएमसी पाणीसाठा; तर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी... adjustशारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा : जिल्हाधिकारी अमोल येडगे adjustसंजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे MHT-CET परीक्षेत यश
SMP_news_Gokul_ghee
schedule08 Jun 24 person by visibility 218 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीई ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवरती नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याअंतर्गतच इटूओपन या नामांकित कंपनीने कॅम्पस इंटरव्हयूव आयोजित केला होता. या इंटरव्हयूवमध्ये डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील १० विद्यार्थ्यांची आठ लाख पॅकेजवरती निवड झाली आहे.

 राहूल भंडारी, रत्नेश पाटील, भक्ती आलासे, अर्सलान फारुक, रोहन भोपळे, दिग्वीजय ढोले, प्रथमेश पाटील, तेजस पुंडपाल, केदार सोलापूरे व आर्या सहस्त्रबुध्दे यांची निवड करण्यात आली.
इटूओपन चे मुख्य कार्यालय अमेरिका टेक्सास येथे असून, ही कंपनी क्लाउड तंत्रज्ञानावर काम करीत असून कपंनी सप्लाय चेन मॅनेजमेंट या डोमेन मध्ये काम करीत आहे त्यांच्या ग्राहकांना क्लाउड बेसड तसेच दूरसंचार, सॉफटवेअर, संगणक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ही कंपनी सेवा देत आहे.

कॅम्पस इंटरव्हयूव ही आजच्या शैक्षणिक जिवनातील अत्याआवश्यक बाब बनली असून त्यासाठी लागणारी ऍप्टीटयूड टेस्ट तसेच सॉफ्ट स्कील या सर्व बाजूंची डीकेटीईमध्ये योग्य तयारी करुन घेतली. याचाच परिणाम कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये दिसत असून यावर्षी इटूओपन या आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीने डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

डीकेटीई मध्येे कॅम्पस इंटरव्हयूवच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्याच्या कॅम्पस इंटरव्हयूवसाठी सॉफ्टस्कील चाचणी व त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्नीकल मुलाखातीसाठीही कॉलेजच्या तज्ञ प्राध्यपकांचे कडून मार्गदर्शन केले जाते. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्याना इंटरव्हयूवमध्ये होत आहे.

डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, डॉ सौ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांना शुभेेच्छा दिल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ.एस.के. शिरगावे, प्रा. डॉ. डी.व्ही. कोदवडे, प्रा. डॉ. एस.ए.पाटील, टीपीओ प्रा. जी.एस. जोशी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.