डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल
schedule08 Jul 25 person by visibility 228 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षा २०२५ मध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून आरती जाधव हिला ९२.७० टक्के गुणांसह डिप्लोमा विभागात सर्वप्रथम आली आहे. संस्थेतील ८२ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये तर ११६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डीकेटीई संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. हे यश मिळविण्यात विद्यार्थ्यांसोबतच तज्ञ प्राध्यापकवर्ग, अभ्यासकेंद्रीत वातावरण, अद्यायवत लॅब्स आणि संस्थेच्या शिस्तबध्द शैक्षणिक धारेणांचा मोलाचा वाटा आहे.
डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स विभागातील प्रथम वर्षात- आर्यन जाधव ८४.७६ टक्के, प्रांजल मगदुम ८३.०६ टक्के, सकीब नदाफ ८१.५३ टक्के, द्वितीय वर्षात - शंतनु केस्तीकर ९१.०५ टक्के, राजवर्धन काकडे ८९.९५ टक्के, श्रेयश शिरगुप्पे ८४.२९ टक्के, तृतीय वर्षात - मोईन तांबोळी ८९.७६ टक्के, सुदर्शन मगदुम ८९.२९ टक्के, कृष्णा मगदुम ८४.६५ टक्के अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. संस्थेतील डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी विभागात मलिकरेहान कलावंत ८७.४७ टक्के, कार्तिक बिद्रीकोठीमठ ८२.७६ टक्के, प्रकाश घटटे ८२.२९ टक्के, द्वितीय वर्षात श्रेय गजमल ८५.३५ टक्के, शुभांगी कुंभार ८३.५४ टक्के, निरज नाईक ८१.९२ टक्के, तृतीय वर्षात रोहित कुंभार ८७.४६ टक्के, प्राजक्ता माने ८७.२४ टक्के, पूर्वा काळे ८६.२७ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. तसेच डिप्लोमा इन फॅशन अँण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी विभागात प्रथम वर्षात- प्रतिभा मगदुम ८५.५९ टक्के, पूजा चौधरी ८४.३५ टक्के, ईश्वरी रंगापुरे ८०.३५ टक्के, द्वितीय वर्षात- आरती जाधव ९२.७० टक्के, पूर्वा जाधव ८९.८३ टक्के, श्रेया सरबी ८५.३२ टक्के, तृतीय वर्षात- निशा शिंत्रे ८६.७३ टक्के, वेदांती माळी ८२.९१ टक्के व अमृता कांबळे ८२.५५ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व ट्रस्टी यांनी भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना संचालिका डॉ एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख प्रा.आर.के.वळसंग सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.