SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेशकोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाईमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा दिमाखात शुभारंभ!के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोलीकोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: शेल कंपनीच्या नावाखाली म्युल बँक खाती चालवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २१ लाखांचा मुद्देमाल जप्तकोल्हापुरात 'गोल्ड हंटर्स गँग'वर मोक्का अंतर्गत कारवाई; जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाईकल्पनेपासून उद्योगापर्यंत: केआयटी-आयआरएफच्या कार्यशाळेत नवउद्योजकांना मिळाला यशाचा मूलमंत्र!भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सवकोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेश

schedule04 Sep 26 person by visibility 141 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर  महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज अत्यंत आक्रमक वातावरणात पार पडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात तातडीने खड्डेमुक्ती मोहीम राबवण्याचे सक्त आदेश देत स्थायी समितीने मनमानी करणाऱ्या यंत्रणेला धारेवर धरले. विशेषतः जेसीबी खरेदी प्रस्तावात समितीची दिशाभूल केल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत, दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून बडतर्फ करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

सभेच्या सुरुवातीला धोकादायक वृक्षतोड आणि फांद्या छाटण्यासाठी संग्राम शिवाजीराव भोसले यांची महानगरपालिकेच्या मंजूर दराप्रमाणे प्रति टन देयकानुसार नवीन ठेकेदार म्हणून ३० दिवसांच्या मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली. काम समाधानकारक झाल्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, उद्यान विभागाचे फांद्या छाटणारे कर्मचारी नेमके काय काम करतात, याबाबतचा जाब पुढील सभेत मागवण्यात आला आहे. तसेच गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे 'जिप्साट' (GIPSAT) तंत्रज्ञानाने पॅचवर्क करून तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. हे काम करताना वापरलेल्या मटेरियलचा दर्जा व लेअरची तपासणी करूनच बिल अदा केले जाईल, अशी तक्कल शहर अभियंत्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.

दरम्यान, सभेमध्ये वर्कशॉप विभागाच्या कारभारावरून मोठा गोंधळ उडाला. आरोग्य, पवडी आणि पाणी पुरवठा विभागासाठी दोन बॅक होलोडोर जेसीबी मशीन खरेदी करताना, स्थायी समितीने यापूर्वी 'जेसीबी' कंपनीचीच मशीन खरेदी करण्यास मंजुरी दिली असतानाही वर्कशॉप विभागाने परस्पर 'टाटा हिताची' कंपनीचा प्रस्ताव समोर आणला. यावर सभापतींसह अभिजीत मोकाशी, पूर्वा राणे व अनुराधा खेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. समितीची दिशाभूल करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत नगरसेवकांनी धारेवर धरल्याने अखेर वर्कशॉप विभागाने हा प्रस्ताव मागे घेतला.

प्रश्न-उत्तरेच्या तासात शहराच्या विविध समस्यांवर गंभीर चर्चा झाली. रस्त्यांची लेव्हल नसलेल्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी आधुनिक 'इन्स्टा रोड पॅचर' तंत्रज्ञानाने कामे करण्याचे ठरले. तसेच सन २०१६-१७ मध्ये दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी दिलेली केबीन दुसऱ्याच व्यक्तीद्वारे वापरली जात असल्याचा मुद्दा प्रतापसिंह जाधव व अभिजीत मोकाशी यांनी उचलून धरला. यावर, महापालिकेने वाटप केलेल्या सर्व १७३ केबीनचा फेरसर्व्हे करून खऱ्या गरजू दिव्यांगांचा अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. कोकणे मठ येथील धोकादायक पाण्याची टाकी तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले, तर मुक्त सैनिक उद्यान जवळील व्हॉल्व गळतीची समस्या सोमवारपासून नवीन व्हॉल्व बसवून सोडवली जाणार आहे. झूम प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वच्छतेच्या मुद्यावर नगरसेविका अर्चना पागर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, त्या रस्त्यावर दोन शिफ्टमध्ये स्वतंत्र दोन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकीत सदस्यांच्या प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे दिल्याशिवाय पुढील सभेचा अजेंडा घेतला जाणार नाही, असा कडक इशारा सभापती विशाल शिराळे यांनी शेवटी दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes