SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - मुदतवाढकोल्हापूरात ‘संपूर्ण गीतरामायण’चा भव्य सोहळा : २३ ते २६ मार्च दरम्यान आयोजनकोरे अभियांत्रिकेत बौद्धिक संपदा हक्क जागरूकता विषयावरील कार्यशाळेचे आयोजनमाणगाव परिषद : सामाजिक क्रांतीचा एल्गारचिवचिव हरवलीय कुठे? : जागतिक चिमणी दिन आणि आपली जबाबदारीगुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही सौर क्रांती : पालकमंत्री प्रकाश आबिटकर‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो..’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविद्यापीठाजवळील केएसबीपी चौकात होणार अजितदादा पवार यांचे स्मारकलोकसेवेचा नवा संकल्प: उपमहापौर अक्षय जरग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकेत बौद्धिक संपदा हक्क जागरूकता विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

schedule20 Mar 26 person by visibility 108 categoryशैक्षणिक

वारणानगर  : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे दिनांक २३ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत बौद्धिक संपदा हक्क जागरूकता व नाविन्यता या विषयावर एका आठवड्याच्या क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे आयोजन संशोधन व विकास कक्षामार्फत, स्थापत्य, रासायनिक, यांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश प्राध्यापक, संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक संपदा हक्क, पेटंट नोंदणी प्रक्रिया, नाविन्यता तसेच संशोधन प्रस्ताव लेखन याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. कार्यशाळेत बौद्धिक संपदा हक्क, पेटंट नोंदणी, नाविन्यपूर्ण संशोधन आणि संशोधन प्रस्ताव लेखन यांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सहभागींना पेटंट प्रक्रियेची माहिती, नाविन्यता वाढविण्याचे मार्ग आणि शासकीय अनुदानासाठी प्रभावी प्रस्ताव लेखन कौशल्य आत्मसात करता येणार आहे.

या कार्यशाळेत देशातील नामवंत तज्ज्ञ प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून भारत सरकारचे प्रतिनिधी  सचिन कुम्भोजे, डॉ. सुर्यकांत डोडमिसे, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) अंतर्गत नवोन्मेष व उद्योजकता केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमराज आर. कुमावत, नागरी अभियांत्रिकी विभाग, आर. सी. पटेल अभियांत्रिकी संस्था, शिरपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अशुतोष कुमार शुक्ला (कॅलिफोर्निया, अमेरिका येथील पदव्युत्तर संशोधक) तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), कानपूर येथील वरिष्ठ संशोधन स्थापत्य अधिकारी त्रैलोक्य सौद यांचा समावेश आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना  वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी म्हणाले की, “या कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापकांना पेटंट प्रणालीची सखोल माहिती, संशोधन प्रस्ताव लेखनाचे कौशल्य तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांसारख्या निधी संस्थांविषयी मार्गदर्शन मिळेल.”

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे,अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के  यांनी शुभेच्छा दिल्या.प्राचार्य डॉ. डी. एन. माने तसेच अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

कार्यशाळेच्या आयोजन समितीत संयोजक म्हणून डॉ. आर. व्ही. काजवे, अधिष्ठाता, संशोधन व विकास तर समन्वयक म्हणून डॉ. एस. व्ही. लिंगाराजू व डॉ. मनीष कुमार कार्यरत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes