मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानासाठी PB-1 फॉर्म शनिवारी दुपारपर्यंत जमा करावेत
schedule02 Jan 26 person by visibility 55 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षणही पुर्ण झालेले आहे.
मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने काम करणाऱ्यां सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्यासाठी PB-1 फॉर्म शनिवार, दि.3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच राजारामपूरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात जमा करावेत असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.





