प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 21 मार्च रोजी डाक अदालत
schedule10 Mar 25 person by visibility 180 categoryराज्य

कोल्हापूर : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर यांच्याव्दारे दिनांक 21 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.)
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ए.यु. निखारे, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 416003 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 17 मार्च 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.