SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नाम. मुश्रीफ, नाम.आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट; डोंगळे कुटुंबियांकडून दोन्ही मंत्र्यांचा सत्कारनूतन मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागतकरवीर नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, आबिटकर यांचे जोरदार स्वागतबीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस'बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे; डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनरोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमासंपुर्ण कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद...डीकेटीईची टीम इनोव्हेटर्सची चेन्नई येथील देशपातळीवरील डीझाईन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने सन्मानविद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंबटाकाळा व उद्यमनगर येथील मोठया दोन थकबाकीधरकांकडून 6 लाख 69 हजार वसूल

जाहिरात

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर

schedule01 Sep 24 person by visibility 416 categoryदेश

मुंबई : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्राला भेट देणार आहेत. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वारणानगर, कोल्हापूर येथे श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

बुधवार ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes